Skip to content
लेवीय १:३-९

गुराढोरांपैकी होमबली

लेवीय १:३-९
“ ‘जर हे होमार्पण गुरांमधून करावयाचे असेल, तर निर्दोष असलेला नरगोर्‍हा तुम्ही अर्पण करावा. तुम्ही ते सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आणावे, म्हणजे ते याहवेहद्वारे मान्य केले जाईल.
तुम्ही तुमचे हात त्या होमार्पणाच्या मस्तकावर ठेवावे आणि प्रायश्चित्त म्हणून तुमच्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वीकारले जाईल.
तुम्ही याहवेहसमोर त्या गोर्‍ह्याचा वध करावा आणि नंतर अहरोनाचे जे पुत्र याजक आहेत, ते त्याचे रक्त आणतील आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या वेदीभोवती शिंपडतील.
तुम्ही यज्ञपशूची कातडी काढावी आणि पशूचे कापून तुकडे करावे.
अहरोनाचे जे पुत्र याजक आहेत, त्यांनी वेदीवर अग्नी ठेवावा आणि अग्नीवर लाकडांची रचना करावी.
नंतर अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी वेदीवर जळत असलेल्या लाकडांवर त्या पशूचे तुकडे, शिर व चरबी यासह व्यवस्थित रचून ठेवावी.
पाय व आतडी पाण्याने धुऊन याजकाने त्या सगळ्यांचे वेदीवर होम करावे. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे. याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options