Skip to content
विलापगीत २:२-५

विलापगीत २:२-५

प्रभूने कसलीच दयामाया न दाखविता याकोबाच्या सर्व आवासांना गिळंकृत केले आहे; त्यांच्या क्रोधाग्नीने यहूदाह कन्येच्या तटबंदीची प्रत्येक भिंत पाडून टाकली आहे. तिचे राज्य व तिचे अधिपती या सर्वांना अपमानित करून त्यांनी जमीनदोस्त केले आहे.
त्यांच्या क्रोधात त्यांनी इस्राएलचे प्रत्येक शिंग नष्ट केले आहे. शत्रूने हल्ला केला तेव्हा त्यांनी त्यांचा संरक्षण करणारा उजवा हात काढून घेतला आहे. पेटलेल्या अग्नीप्रमाणे त्यांनी याकोबाभोवती असलेले सर्वकाही भस्म करून टाकले आहे.
शत्रूसारखे त्यांनी धनुष्य वाकविले आहे; त्यांचा उजवा हात सज्ज झाला आहे. शत्रूसारखे त्यांनी नयनरम्य तरुणांचा संहार केला आहे. त्यांनी त्यांच्या क्रोधाग्नीचा सीयोन कन्येच्या तंबूवर वर्षाव केला आहे.
प्रभू शत्रूसारखे झाले आहेत; त्यांनी इस्राएलला गिळंकृत केले आहे. त्यांनी तिचे सर्व राजवाडे गिळंकृत केले आहेत आणि दुर्ग उद्ध्वस्त केले आहेत. यहूदीया कन्येचा शोक व विलाप त्यांनी बहुगुणित केला आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options