शास्ते ५:२३
आजूबाजूच्या संदर्भासह वचन २३ दाखवत आहे.
२०
आकाशातून तारे लढले, त्यांच्या मार्गावरून ते सिसेराशी लढले.
२१
किशोन नदीने त्यांना वाहून नेले, पुरातन नदी, किशोन नदी. कूच कर, माझ्या आत्म्या; समर्थ होऊन पुढे जा!
२२
घोड्यांच्या टापांचा गडगडाट झाला— घोडे चौखूर उधळले, त्याचे सशक्त घोडे चौखूर उधळले!
२३
याहवेहच्या दूताने आदेश दिला, ‘मेरोजला शाप द्या. त्याच्या लोकांना कडवटपणे शाप द्या, कारण ते याहवेहला मदत करावयाला आले नाहीत, पराक्रमी लोकांविरुद्ध याहवेहला मदत करावयाला आले नाहीत.’
२४
“स्त्रियांमध्ये सर्वाधिक आशीर्वादित याएल, केनी हेबेरची पत्नी, तंबूत राहणार्या स्त्रियांमध्ये सर्वात धन्य.
२५
त्याने पाणी मागितले आणि तिने त्याला दूध दिले; आणि सरदाराला साजेल अशा वाटीत त्याला दही दिले.
२६
तिचा हात तंबूच्या खुंटीकडे गेला, उजवा हात कामगाराच्या हातोडीसाठी. तिने सिसेराला मारले, तिने त्याचे डोके चिरडले. तिने त्याच्या कपाळाचे भोसकून तुकडे केले.
Settings