Skip to content
शास्ते २१:२

शास्ते २१:२

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
इस्राएलांच्या पुरुषांनी मिस्पाह येथे प्रतिज्ञा केलेली होती: “आपल्यापैकी कोणीही आपल्या कन्यांना बिन्यामीन गोत्रांना विवाहात देणार नाही.”
ते बेथेल येथे गेले, जिथे संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर बसून त्यांनी उच्चस्वरात शोक केला.
“याहवेह इस्राएलांचे परमेश्वर,” ते आक्रंदून म्हणाले, “इस्राएल सोबत असे का घडले? आज इस्राएलातील एक गोत्र का कमी झाले?”
मग दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून, त्यांनी तिथे वेदी बांधली आणि तिच्यावर होमार्पण व शांत्यर्पणे अर्पिली.
नंतर इस्राएली लोकांनी हे विचारले, ते एकमेकास विचारू लागले, “इस्राएलाच्या सर्व गोत्रांमधून असा कोणी आहे, जो या सभेत याहवेहसमोर आला नाही?” कारण त्यांनी गंभीरतेने शपथ घेतली होती की, जो कोणी मिस्पाह येथे याहवेहसमोर उपस्थित राहणार नाही, त्याला अवश्य जिवे मारावे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options