यहोशुआ ७:१८-२०
१८
मग जब्दीच्या घराण्यातील एकाएका पुरुषाला समोर आणण्यात आले आणि यहूदाहच्या वंशातील जेरहाचा पुत्र जब्दीचा पुत्र कर्मीचा पुत्र आखान निवडला गेला.
१९
तेव्हा यहोशुआ आखानास म्हणाला, “माझ्या मुला, याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचे गौरव कर आणि आपले पाप कबूल कर. तू काय केलेस ते मला सांग; माझ्यापासून काहीही लपवू नकोस.”
२०
तेव्हा आखानाने यहोशुआला उत्तर दिले, “खचितच मी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. मी जे केले ते हे:
Settings