यहोशुआ ३:१०-१३
१०
यहोशुआ म्हणाला, अशाप्रकारे तुम्हाला कळेल की जिवंत परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत व कनानी, हिथी, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसींना ते खचितच तुमच्या समोरून घालवून देतील.
११
पाहा, अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश तुमच्यापुढे यार्देन नदीत प्रवेश करेल.
१२
तर आता इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक असे बारा पुरुष निवडा.
१३
याहवेह अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश वाहून नेणार्या याजकांचे पाय यार्देनला लागताच, वरून वाहत येणारे पाणी थांबेल व त्याची रास उभी राहील.”
Settings