Skip to content
इय्योब ३९:१०-१५

इय्योब ३९:१०-१५

१०
त्याला जुंपणीने बांधून तुला नांगरणी करता येईल काय? तुझ्यामागे जमिनीची मशागत तो करेल काय?
११
त्याच्या मोठ्या बलावर तू अवलंबून राहशील काय? तुझी जड कामे तू त्याच्यावर सोडशील काय?
१२
खळ्यातून तुझे धान्य खेचून घेऊन ते तुझ्या मळणीपर्यंत तो ते आणेल असा तू त्याच्यावर विश्वास ठेवशील काय?
१३
“जरी करकोचाच्या पंखांशी आणि पिसार्‍याशी त्यांची तुलना करता येत नाही तरी शहामृगाचे पंख आनंदाने फडफडतात.
१४
ती धुळीत आपली अंडी देते आणि वाळूमध्ये ती उबविते,
१५
एखाद्याच्या पायाखाली ती चिरडली जातील, किंवा कोणी वन्यपशू त्याला तुडवतील हे ती लक्षात घेत नाही.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.