Skip to content
इय्योब ३३:१४-२२

इय्योब ३३:१४-२२

१४
कारण परमेश्वर एकदा एका, मग दुसर्‍या मार्गाने मानवांशी बोलत असतात— जरी कोणाला त्याचे अवलोकन होत नाही.
१५
रात्रीच्या स्वप्नात, दृष्टान्तामध्ये, जेव्हा लोकांना गाढ झोप लागलेली असते त्यांच्या बिछान्यावर डुलक्या घेत असताना,
१६
परमेश्वर त्यांच्या कानात बोलून आणि चेतावणी देऊन त्यांना घाबरवितात,
१७
म्हणजे ते मनुष्याच्या चुकीच्या वर्तनापासून फिरतील आणि अहंकारापासून दूर राहतील,
१८
खड्ड्यात पडण्यापासून आणि तलवारीने त्यांचे जीवन नष्ट होण्यापासून त्यांना राखतील.
१९
“किंवा काहींना वेदनादायक बिछान्यावर त्यांच्या हाडांमध्ये सततच्‍या क्लेशाने शासन होते,
२०
अशासाठी की त्यांच्या शरीराला अन्नाची किळस वाटेल आणि त्यांचा जीव मिष्टान्नाचा तिरस्कार करतो.
२१
त्यांचे मांस दिसेनासे होते, आणि त्यांची लपलेली हाडे आता बाहेर लटकलेली दिसतात.
२२
ते त्यांच्या कबरेजवळ पोहोचतात, आणि त्यांचे जीवन मृतांच्या ठिकाणाकडे जाऊन ठेपते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options