११
ज्यांनी माझे बोलणे ऐकले ते सर्व माझ्याविषयी चांगले बोलत, आणि ज्यांनी मला बघितले त्यांनी माझी प्रशंसा केली.
१२
कारण जे गरीब मदतीसाठी याचना करीत आणि ज्या अनाथांच्या मदतीला कोणी नसे, त्यांची मी सुटका केली.
१३
मरत असलेला व्यक्ती मला आशीर्वाद देत असे; आणि विधवांचे हृदय मी आनंदित केले.