Skip to content
इय्योब १३:१३

इय्योब १३:१३

आजूबाजूच्या संदर्भासह वचन १३ दाखवत आहे.
१०
जर तुम्ही गुप्तपणे पक्षपात कराल तर परमेश्वर तुमच्याकडून निश्चितच हिशोब मागेल.
११
त्यांचे वैभव तुम्हाला भयभीत करीत नाही का? त्यांचे भय तुम्हावर पडणार नाही का?
१२
तुमच्या नीतिवचनांना राखेएवढेच मोल आहे; तुमचे रक्षण हा मातीचा बचाव आहे.
१३
“आता गप्प राहा व मला बोलू द्या; मग माझ्यावर जे यावयाचे ते येवो.
१४
मी स्वतःला धोक्यात का टाकू आणि माझे जीवन माझ्याच हातात का घेऊ?
१५
जरी परमेश्वराने मला मारून टाकले, तरीही मी त्यांच्यावर आशा ठेवेन; व खचितच त्यांच्यासमोर मी माझ्या मार्गाचे समर्थन करेन.
१६
खचितच ह्यातच माझी खरी मुक्ती आहे, कारण कोणी देवहीन व्यक्ती त्यांच्यासमोर येण्याचे धाडस करणार नाही!
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options