यिर्मयाह ३६:२७-३१
२७
राजाने यिर्मयाह संदेष्ट्याला सांगून नेरीयाहचा पुत्र बारूखाने लिहिलेली वचने असलेले ते चर्मपत्र जाळून टाकल्यावर, यिर्मयाहला याहवेहची वचने आली:
२८
“दुसरे एक चर्मपत्र घे व त्यावर यहूदीयाचा राजा यहोयाकीमने जाळून टाकलेल्या पहिल्या चर्मपत्रावर लिहिलेली सर्व वचने लिहून काढ.
२९
याशिवाय यहूदीयाचा राजा यहोयाकीमला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: तू ते चर्मपत्र जाळले व म्हटले, “बाबेलचा राजा निश्चितच येईल व हा देश नष्ट करेल आणि मनुष्य व पशूंना पूर्णपणे नाहीसे करेल, असे त्या चर्मपत्रावर का लिहिले?”
३०
म्हणून यहूदीयाचा राजा यहोयाकीमविषयी, याहवेह असे म्हणतात: दावीदाच्या राजासनावर बसण्यासाठी त्याला कोणीही वारस असणार नाही; त्याचे प्रेत बाहेर दिवसा उन्हामध्ये व रात्रीच्या हिवात पडून राहील.
३१
मी त्याला, त्याच्या लेकरांना व त्याच्या सेवेकऱ्यांना त्यांच्या सर्व दुष्टतेकरिता शिक्षा देईन; मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यावर, तसेच यहूदीयात राहणाऱ्या लोकांवर व यरुशलेम येथील सर्व लोकांवर घोषित केलेली अरिष्टे आणेन, कारण त्यांनी माझे ऐकले नाही.’ ”
Settings