Skip to content
यिर्मयाह १५:२-४

यिर्मयाह १५:२-४

आणि जर त्यांनी तुला विचारले, ‘आम्ही कुठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: “ ‘ज्यांना मरणासाठी नेमले आहे, त्यांनी मरणाकडे जावे; तलवारीने ज्यांचा वध व्हावयाचा आहे, त्यांनी तलवारीकडे जावे; उपासमारीने जे मरणार आहेत, त्यांनी दुष्काळाकडे जावे; जे बंदिवासासाठी नेमलेले आहेत, त्यांनी बंदिवासात जावे.’
“मी त्यांच्यावर चार प्रकारचे संहारक नेमणार आहे,” याहवेहने असे म्हटले, “ठार करण्यासाठी तलवार, फरपटून नेण्यासाठी कुत्री, खाऊन नष्ट करण्यासाठी पक्षी व हिंस्र श्वापदे.
यहूदीयाचा राजा हिज्कीयाहचा पुत्र मनश्शेह, याने यरुशलेममध्ये जे अनाचार केले, त्याबद्दल मी केलेले शासन पाहून सर्व जगातील राष्ट्रांना दहशत बसेल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options