Skip to content
यिर्मयाह १२:१-६

यिर्मयाह १२:१-६

हे याहवेह, मी तुमच्यापुढे जेव्हा निवाड्यासाठी वाद आणतो, तेव्हा तुम्ही मला नेहमी धार्मिकतेने वागविता. तरी देखील मला तुमच्या न्यायनिवाड्याबद्धल बोलू द्या: वाईट माणसे एवढी समृद्ध का असतात? सर्व विश्वासहीन लोक सुखी का असतात?
तुम्हीच त्यांचे रोपण केले आणि ते मुळावले; ते वाढतात व फलवंत होतात. तुमचे नाव सतत त्यांच्या मुखात असते परंतु त्यांच्या अंतःकरणापासून तुम्ही फार दूर असता.
पण याहवेह, तुम्ही मला ओळखता; मला बघता व तुमच्याबद्दल माझ्या विचारांची परीक्षा घेता. मेंढरांना कत्तलखान्याकडे फरफटत न्यावे तसे त्यांना न्या! कत्तलीच्या दिवसासाठी त्यांना वेगळे करा!
किती काळ ही भूमी कोरडी ठणठणीत राहील आणि प्रत्येक कुरणातील गवत सुकलेले असेल? कारण जे या ठिकाणी राहतात ते दुष्ट आहेत, पशू व पक्षी नाहीसे झाले आहेत. त्यावर लोक म्हणतात, “परमेश्वर आमचा परिणाम बघणारही नाही.”
“जर माणसांबरोबर तू पायी धावतो आणि तू थकून इतका झिजून गेलास, तर घोड्यांबरोबर तू स्पर्धा कशी करशील? जर सुरक्षित देशात तू अडखळतोस, तर यार्देनेच्या जंगलात तू कसे करशील?
तुझे नातेवाईक, तुझ्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्य— यांनी देखील तुझा विश्वासघात केला आहे; ते मोठ्याने ओरडून तुझा विरोध करतात. तुझ्याशी ते गोड गोड गोष्टी बोलले तरी त्यांच्यावर भरवसा ठेवू नकोस.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options