Skip to content
यशायाह १४:२४-२७

यशायाह १४:२४-२७

२४
सर्वसमर्थ याहवेहनी शपथ घेतली आहे, “निश्चितच, मी जी योजना केली आहे, तसेच होईल, आणि जो माझा संकल्प आहे, त्याप्रमाणे हे घडून येईल.
२५
माझ्या भूमीवर मी अश्शूरांना चिरडून टाकेन; त्यांना माझ्या डोंगरावर तुडवेन. त्याचे जू माझ्या लोकांवरून काढून टाकेन, आणि त्याचे ओझे त्यांच्या खांद्यावरून उतरवेन.”
२६
अखिल पृथ्वीसाठी ही योजना केली आहे; सर्व देशांवर हा हात फिरविला जाईल.
२७
सर्वसमर्थ याहवेहचा हा संकल्प आहे, तो कोण निष्फळ करू शकतो? त्यांचा हात उठला आहे, त्याला कोण आवर घालू शकतो?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options