Skip to content
यशायाह १०:१२-१५

यशायाह १०:१२-१५

१२
जेव्हा प्रभूने सीयोन पर्वत आणि यरुशलेमविरुद्ध त्यांचे सर्व कार्य पूर्ण केले, तेव्हा ते म्हणतील, “मी अश्शूरच्या राजाला त्याच्या अंतःकरणाच्या हेतुपुरस्सर अभिमानाबद्दल आणि त्याच्या नजरेतील गर्विष्ठपणाबद्दल शिक्षा करेन.
१३
कारण ते म्हणतात: “ ‘माझ्या हाताच्या शक्तीने मी हे केले आहे, आणि माझ्या शहाणपणाने हे केले आहे, कारण माझ्याकडे समंजसपणा आहे. मी राष्ट्रांच्या सीमा काढून टाकल्या, मी त्यांचे खजिने लुटले; एका बलवानाप्रमाणे मी त्यांच्या राजांना वश केले.
१४
जसा कोणी घरट्यात पोहोचतो, तसेच राष्ट्रांच्या संपत्तीसाठी माझा हात पोहोचला. जसे लोक सोडून दिलेली अंडी गोळा करतात, तसे मी सर्व देशांना एकत्र केले; कोणीही पंख फडफडविला नाही, किंवा किलबिल करण्यासाठी तोंड उघडले नाही.’ ”
१५
जो कुर्‍हाड फिरवितो त्याच्यावरच कुऱ्हाड उठते काय, किंवा करवतीचा जो वापर करतो त्याच्याचविरुद्ध ती बढाई मारते काय? जसे एखादा व्यक्ती जी काठी उचलतो तीच त्याच्यावर उगारते काय, किंवा जे लाकूड नाही, त्याला धमकावण्यासाठी जड काठी हवेत फिरते काय!
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options