उत्पत्ती ४९:१३-१८
१३
“जबुलून समुद्रकिनारी राहील आणि तो जहाजांचे बंदर होईल. त्याची सीमा सीदोनपर्यंत पसरेल.
१४
“इस्साखार बळकट गाढव आहे. तो मेंढवाड्यांमध्ये दबून बसला आहे.
१५
त्याची विश्रांतीची जागा किती रम्य आहे आणि तिकडचा प्रदेश किती आल्हाददायक आहे, हे पाहून तो आपल्या खांद्याला भार वाहण्यासाठी वाकवेल आणि मजुरीचा दास होऊन जाईल.
१६
“दान आपल्या लोकांना न्यायदान करेल, इस्राएलाच्या एका गोत्राप्रमाणे तो हे करेल.
१७
दान हा रस्त्याच्या कडावरील सर्प बनेल, तो वाटेवरील विषारी सर्प बनेल, जो घोड्याच्या टापांचा चावा घेईल व घोडेस्वार खाली कोसळेल.
१८
“हे याहवेह, मी तुमच्या तारणाची वाट पाहत आहे.
Settings