उत्पत्ती ४:२०-२२
२०
आदाह हिला याबाल नावाचा पुत्र झाला. तो गुरे पाळणार्या व तंबू ठोकून राहणार्या लोकांचा मूळ पुरुष झाला.
२१
त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते. तो पहिला संगीतकार असून वीणा व बासरी ही वाद्ये वाजविणार्यांचा मूळ पुरुष झाला.
२२
लामेखाची दुसरी स्त्री सिल्ला हिला तुबल-काईन झाला. तो कास्य व लोखंड यांची हत्यारे बनविणार्यांचा मूळ पुरुष झाला. तुबल—काईनास नामाह नावाची बहीण होती.
Settings