Skip to content
उत्पत्ती ४:१९

उत्पत्ती ४:१९

आजूबाजूच्या संदर्भासह वचन १९ दाखवत आहे.
१६
मग काईन याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला आणि एदेन बागेच्या पूर्वेस असलेल्या नोद नावाच्या देशात वस्ती करून राहिला.
१७
पुढे काईनाने त्याच्या पत्नीशी वैवाहिक प्रीती संबंधात प्रवेश केला आणि ती गर्भवती झाली. तिने हनोख नावाच्या पुत्राला जन्म दिला. त्यावेळी काईन एक नगर बांधत होता, त्याने आपल्या पुत्राचे, हनोख हे नाव त्या नगराला दिले.
१८
हनोखपासून ईराद झाला आणि ईराद हा महूयाएलचा पिता, महूयाएल हा मथुशाएलचा पिता, मथुशाएल हा लामेखाचा पिता होता.
१९
लामेखाने आदाह व सिल्ला या दोन स्त्रियांशी लग्न केले.
२०
आदाह हिला याबाल नावाचा पुत्र झाला. तो गुरे पाळणार्‍या व तंबू ठोकून राहणार्‍या लोकांचा मूळ पुरुष झाला.
२१
त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते. तो पहिला संगीतकार असून वीणा व बासरी ही वाद्ये वाजविणार्‍यांचा मूळ पुरुष झाला.
२२
लामेखाची दुसरी स्त्री सिल्ला हिला तुबल-काईन झाला. तो कास्य व लोखंड यांची हत्यारे बनविणार्‍यांचा मूळ पुरुष झाला. तुबल—काईनास नामाह नावाची बहीण होती.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options