१६
लाबानाला दोन कन्या होत्या. वडील कन्येचे नाव लेआ व धाकटीचे नाव राहेल.
१७
लेआचे डोळे निस्तेज होते पण राहेल बांधेसूद व दिसायला सुंदर होती.
१८
याकोबाचे राहेलवर प्रेम बसले होते, म्हणून तो म्हणाला, “मला तुमची धाकटी मुलगी राहेल पत्नी म्हणून द्याल, तर मी तुमच्यासाठी सात वर्षे काम करेन.”