एज्रा ८:१
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १ दाखवत आहे.
१
अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीत, बाबेलहून माझ्याबरोबर आलेल्या पुढार्यांची नावे व वंशावळी येणेप्रमाणे आहे:
२
फिनहासाच्या कुळातील: गेर्षोम; इथामाराच्या कुळातील: दानीएल; दावीदाच्या कुळातील: हट्टूश
३
हा शखन्याहच्या कुळातील; पारोशच्या कुळातील: जखर्याह व त्याच्याबरोबर 150 पुरुषांची नोंदणी झाली;
४
पहथ-मोआबच्या कुळातील: जरह्याहचा पुत्र एलिओएनाइ व इतर 200 पुरुष;
Settings