Skip to content
यहेज्केल ८:१-३

यहेज्केल ८:१-३

सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, जेव्हा मी माझ्या घरात बसलो होतो आणि यहूदीयाचे वडीलजन माझ्यापुढे बसले होते, तिथे सार्वभौम याहवेहचा हात माझ्यावर आला.
मी पाहिले, आणि मनुष्यासारखी दिसणारी एक आकृती मला दिसली. त्याच्या कमरेसारख्या दिसणार्‍या भागापासून खालचा भाग अग्नीसारखा होता आणि तिथून वरच्या भागाचे रूप तेजस्वी धातूसारखे प्रज्वलित होते.
हातांसारख्या दिसणार्‍या आकृतिसारखे त्याने काहीतरी पुढे केले व माझे डोक्याचे केस धरले. मग आत्म्याने मला पृथ्वी व आकाशाच्या दरम्यान वर उचलले आणि परमेश्वराच्या दृष्टान्तामध्ये त्याने मला यरुशलेमला, आतील अंगणाच्या उत्तरेकडील दरवाजाच्या प्रवेशाकडे नेले, जिथे ईर्षेस प्रवृत्त करणारी मूर्ती उभी होती.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options