यहेज्केल ५:११-१२
११
म्हणून सार्वभौम याहवेह असे घोषित करतात, की माझ्या जिवाची शपथ, तुम्ही तुमच्या व्यर्थ मूर्तींनी व अमंगळ कृत्यांनी माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे, म्हणून मी स्वतः तुमचे मुंडण करेन; मी तुमच्यावर दया करणार नाही किंवा तुमची गय करणार नाही.
१२
तुमच्यातील एकतृतीयांश लोक मरीने किंवा तुमच्यामध्ये येणार्या दुष्काळाने मरतील; एकतृतीयांश लोक तुझ्या भिंतींच्या बाहेर तलवारीने पडतील; आणि एकतृतीयांश मी वार्यावर पसरवीन व उपसलेल्या तलवारीने त्यांचा पाठलाग करेन.
Settings