Skip to content
यहेज्केल ४४:५-८

यहेज्केल ४४:५-८

याहवेहने मला म्हटले, “मानवपुत्रा, काळजीपूर्वक पाहा, जवळून ऐक आणि याहवेहच्या मंदिराविषयी जे सर्व नियम व सूचना मी तुला सांगतो त्या सर्वांकडे लक्ष दे. मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांकडे आणि पवित्रस्थानातून बाहेर जाण्याच्या मार्गांकडे लक्ष दे.
बंडखोर इस्राएलास सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: अहो इस्राएली लोकांनो तुम्ही जी अमंगळ कृत्ये केली ती पुरे!
तुमच्या अमंगळ कृत्यांसह तुम्ही हृदयाने आणि शरीराने बेसुंती असे विदेशी लोक माझ्या पवित्रस्थानात आणले, अन्न, चरबी आणि रक्ताची अर्पणे करून तुम्ही माझे मंदिर भ्रष्ट केले आणि माझा करार मोडला.
माझ्या पवित्र वस्तूंबाबत तुमची जबाबदारी पार पाडण्याऐवजी, तुम्ही माझ्या पवित्रस्थानाची कर्तव्ये इतरांना सोपविली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options