यहेज्केल ४४:२३-२६
२३
पवित्र व साधारण यातील फरक आणि शुद्ध व अशुद्ध यात कसा फरक करावा हे त्यांनी माझ्या लोकांना शिकवावे.
२४
“ ‘कोणताही विवाद असल्यास, याजकांनी न्यायाधीश म्हणून असावे आणि माझ्या निर्णयानुसार निर्णय घ्यावा. माझ्या नेमलेल्या सर्व सणांसाठी त्यांनी माझे नियम व विधी पाळावे आणि त्यांनी माझे शब्बाथ पवित्र राखावे.
२५
“ ‘मृत देहाकडे जाऊन याजकाने स्वतःस अशुद्ध करू नये; तरीही ती मृत व्यक्ती जर त्याचा पिता किंवा आई, मुलगा किंवा मुलगी, भाऊ किंवा अविवाहित बहीण असली, तर तो स्वतःस अशुद्ध करू शकतो.
२६
शुद्धीकरण झाल्यावर त्याने सात दिवस थांबावे.
Settings