यहेज्केल ३७:२६-२८
२६
मी त्यांच्याशी शांतीचा करार करेन; तो सर्वकाळचा करार असेल. मी त्यांना स्थापित करेन आणि त्यांची संख्या बहुगुणित करेन, आणि मी माझे पवित्रस्थान सर्वकाळासाठी त्यांच्यात ठेवेन.
२७
माझे निवासस्थान त्यांच्याबरोबर राहील; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील.
२८
जेव्हा माझे पवित्रस्थान सदासर्वकाळ त्यांच्यामध्ये राहील, तेव्हा सर्व राष्ट्रे जाणतील की मी याहवेह इस्राएलला पवित्र करतो.’ ”
Settings