यहेज्केल ३३:२४-२९
२४
“मानवपुत्रा, इस्राएलात ओसाडीमध्ये राहत असलेले लोक म्हणतात, ‘अब्राहाम केवळ एक मनुष्य होता, तरीही त्याला देश वतन मिळाला. परंतु आम्ही तर पुष्कळ आहोत; खचितच हा देश आम्हाला आमचे वतन म्हणून दिला गेला आहे.’
२५
म्हणून त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मांसात रक्त असताच तुम्ही ते खाता आणि रक्तपात करत तुमच्या मूर्तींकडे बघता, तर मग तुम्ही या देशाचे वतन मिळविणार काय?
२६
तुम्ही तुमच्या तलवारीवर भिस्त ठेवता, तुम्ही अमंगळ कृत्ये करता, तुम्हातील प्रत्येकजण आपल्या शेजार्याच्या पत्नीला भ्रष्ट करतो. तरी तुम्हाला देशाचे वतन मिळावे काय?’
२७
“त्यांना असे सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या जीविताची शपथ, जे ओसाडीमध्ये उरलेले आहेत ते तलवारीने पडतील, जे शहराच्या बाहेर आहेत त्यांना जंगली जनावरांनी खावे म्हणून मी देऊन टाकेन, आणि जे गडात व गुहेत आहेत ते मरीने मरतील.
२८
मी या देशास वैराण करेन आणि तिच्या अहंकारी बळाचा शेवट होईल आणि इस्राएलचे डोंगर ओसाड पडतील व त्यातून कोणी पार जाणार नाही.
२९
त्यांनी केलेल्या अमंगळ कृत्यांमुळे जेव्हा मी हा देश ओसाड करेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’
Settings