Skip to content
यहेज्केल ३२:१७

यहेज्केल ३२:१७

आजूबाजूच्या संदर्भासह वचन १७ दाखवत आहे.
१४
तेव्हा मी तिचे पाणी स्थिर करेन आणि तिचे प्रवाह तेलाप्रमाणे वाहतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
१५
जेव्हा मी इजिप्त ओसाड करेन आणि देशात असलेले सर्वकाही काढून घेईन, जेव्हा तिथे वसत असलेल्या सर्वांचा मी नाश करेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’
१६
“तिच्यासाठी जे विलापगीत ते गातील ते हेच. राष्ट्रांच्या कन्या हे गातील; इजिप्त व तिच्या सर्व सैन्यासाठी त्या हे गातील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”
१७
बाराव्या वर्षी, महिन्याच्या पंधराव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
१८
“मानवपुत्रा, इजिप्तच्या सैन्यासाठी विलाप कर आणि तिला व शक्तिशाली राष्ट्रांच्या कन्यांना खाली गर्तेत जाणार्‍यांबरोबर पृथ्वीच्या खाली हवाली कर.
१९
त्यांना सांग, ‘इतरांपेक्षा तू अधिक कृपा पावलेली आहेस काय? तर खाली जा आणि बेसुंत्यांबरोबर जाऊन पड.’
२०
जे तलवारीने पडले त्यांच्याबरोबर ते पडतील. तलवार उगारलेली आहे; तिच्या सर्व समूहास ओढून न्या.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options