यहेज्केल २९:१८-१९
१८
“मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने त्याच्या सैन्याला कठोरतेने सोरविरुद्ध पाठवले; प्रत्येक डोके टकले झाले आणि प्रत्येक खांदा सोलून काढला. तरीही त्याने हे जे कठीण कष्टाचे अभियान सोरविरुद्ध चालविले त्याबद्दल त्याला व त्याच्या सैन्याला काहीही प्रतिफळ मिळाले नाही.
१९
यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी इजिप्त देशाला बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हाती देणार आहे आणि तो त्यांची संपत्ती घेऊन जाईल. तो हरण करून लुटून घेईल आणि तो देश त्याच्या सैन्याला मोबदला म्हणून होईल.
Settings