यहेज्केल २९:१-९
१
दहाव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या बाराव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
२
“मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोहकडे आपले तोंड कर आणि त्याच्या व सर्व इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी कर.
३
त्याच्याशी बोल आणि त्याला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘हे इजिप्तच्या फारोह राजा मी तुझ्याविरुद्ध आहे, तू तो प्रचंड मोठा श्वापद आहेस जो पाण्याच्या प्रवाहात पडून असतो. तू म्हणतोस, “नाईल नदी माझी आहे; तिला मी माझ्यासाठी बनविले आहे.”
४
मी तुझ्या जाभाडात गळ अडकवेन आणि तुझ्या प्रवाहातील मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील असे मी करेन. मी तुला तुझ्या प्रवाहातून ओढून बाहेर काढेन आणि त्यातील सर्व मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील.
५
मी तुला व तुझ्या प्रवाहातील सर्व माशांना वाळवंटात सोडून देईन. तू मोकळ्या मैदानात पडशील आणि तुला ना कोणी जवळ करणार ना उचलणार. पृथ्वीवरील प्राणी व आकाशातील पक्ष्यांसाठी तू खाद्य होशील.
६
तेव्हा इजिप्तमध्ये राहणारे जाणतील की मीच याहवेह आहे. “ ‘तू इस्राएल लोकांसाठी बोरूच्या काठीप्रमाणे होतास.
७
जेव्हा त्यांनी त्यांच्या हातांनी तुला पकडले, तू त्यांना खरडले व त्यांचे खांदे मोडले; जेव्हा ते तुझ्यावर टेकले, तेव्हा तू मोडलास व त्यांच्या कंबरा खचविल्या.
८
“ ‘यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी तुझ्याविरुद्ध तलवार आणेन, मनुष्य व जनावरे या दोघांनाही मारून टाकीन.
९
इजिप्त देश निर्जन व ओसाड होईल. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. “ ‘तू म्हणालास, “नाईल नदी माझी आहे; मी ती निर्माण केली,”
Settings