यहेज्केल २४:३-१४
३
या बंडखोर लोकांना एक दाखला सांग आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘एक कढई घे; आणि विस्तवावर ठेव आणि त्यात पाणी ओत.
४
त्यात मांसाचे तुकडे टाक, सर्वात उत्तम तुकडे; मांडी आणि खांदा. यांच्या उत्तम हाडांनी कढई भर;
५
कळपातील उत्तम मेंढरू निवडून घे. हाडांसाठी कढईच्या खाली लाकडे ठेव; आणि ते उकळून त्यात हाडे शिजव.
६
“ ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘रक्तपाताच्या शहराचा धिक्कार असो, ज्या कढईला गंज लागला आहे, ज्याचा थर जाणार नाही! जसे काढता येईल तसा एकएक मांसाचा तुकडा काढून घ्या.
७
“ ‘कारण तिने सांडलेले रक्त तिच्यामध्येच आहे: ते तिने उघड्या खडकावर ओतले; तिने ते मातीने झाकले जाईल असे, जमिनीवर ओतले नाही.
८
कोप भडकवावा व सूड घ्यावा म्हणून मी तिचे रक्त उघड्या खडकावर ओतेन, म्हणजे ते झाकले जाणार नाही.
९
“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘रक्तपाताच्या शहराचा धिक्कार असो! मी देखील लाकडाचा ढीग उंच करेन.
१०
तर लाकडाचा ढीग करा आणि अग्नी पेटवा. मसाले मिसळून; मास चांगले शिजवून घ्या, हाडे पूर्णपणे जळू द्या.
११
मग रिकामी कढई निखार्यावर ठेवा ती गरम होऊन तिचे तांबे चमकू द्या, म्हणजे तिची अशुद्धता वितळून जाईल आणि त्याचा थर पूर्णपणे जळून जाईल.
१२
परंतु सर्व प्रयत्न वाया गेले; तिच्यावर बसलेला दाट थर निघाला नाही, तो अग्नीने देखील निघाला नाही.
१३
“ ‘आता तुझी अशुद्धता तर दुराचार आहे. कारण तुला शुद्ध करण्याचा मी प्रयत्न केला, परंतु तू तुझ्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली नाहीस, आता तुझ्याविरुद्ध माझा कोप शांत होईपर्यंत तू शुद्ध होणार नाहीस.
१४
“ ‘मी याहवेह हे बोललो आहे आणि मी ते करण्याची वेळ आली आहे. मी आवरून धरणार नाही; मी दया करणार नाही, मी अनुतापणारही नाही. तुझे वर्तन व तुझी कृत्ये यानुसार तुझा न्याय केला जाईल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
Settings