मुख्य मजकुरावर जा
यहेज्केल १०:१८-२२

परमेश्वराचे तेज निघून जाते

यहेज्केल १०:१८-२२
१८
मग याहवेहचे वैभव मंदिराच्या उंबरठ्यावरून निघाले आणि करुबांवर जाऊन थांबले.
१९
मी पाहत असता, करुबांनी आपली पंखे पसरली आणि जमिनीवरून उठले, ते पुढे जात असता, चाकेही त्यांच्याबरोबर गेली. ते याहवेहच्या भवनाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे थांबले, आणि इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव त्यांच्यावर होते.
२०
हे तेच जिवंत प्राणी होते ज्यांना मी इस्राएलच्या परमेश्वराच्या आसनाखाली खेबर नदीकाठी पाहिले होते, आणि मला समजले की हे तेच करूब आहेत.
२१
प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते आणि त्यांच्या पंखाखाली मानवी हातांसारखे काहीतरी होते.
२२
त्यांच्या मुखाचे स्वरूप तर मी खेबर नदीकाठी पाहिले होते तसेच होते. प्रत्येकजण पुढे सरळ चालत असे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options