Skip to content
यहेज्केल १०:१-७

अग्नी विखरून टाकण्याची आज्ञा

यहेज्केल १०:१-७
मग मी पाहिले आणि करुबांच्या डोक्यावर असलेल्या घुमटावर नीलमण्यासारखे दिसणारे सिंहासन मला दिसले.
तेव्हा तागाची वस्त्रे घातलेल्या पुरुषाला याहवेहने म्हटले, “करुबाखालच्या चाकांमधून जा आणि करुबांच्या मधील जळत्या निखार्‍यांनी आपली ओंजळ भर आणि ते शहरात पसरून टाक.” मी पाहत असता, तो आत गेला.
तो मनुष्य आत गेला, तेव्हा करूब मंदिराच्या दक्षिणेकडे उभे होते आणि आतील अंगण ढगांनी भरून गेले.
मग याहवेहचे वैभव करुबांवरून उठले आणि मंदिराच्या उंबरठ्याकडे गेले. मंदिर ढगांनी भरले आणि याहवेहच्या तेजाच्या प्रकाशाने अंगण भरले.
करुबांच्या पंखांचा आवाज बाहेरील अंगणात ऐकू येत होता, तो तर सर्वसमर्थ परमेश्वर बोलतात असा त्यांच्या वाणीसारखा होता.
जेव्हा याहवेहने तागाची वस्त्रे परिधान केलेल्या पुरुषाला आज्ञा दिली, “चाकांच्या मधून, करुबांच्या मधून अग्नी घे,” तो पुरुष जाऊन एका चाकाच्या बाजूला उभा राहिला.
तेव्हा करुबातील एकाने त्यांच्यामध्ये जो अग्नी होता त्याकडे आपला हात लांब केला. त्याने त्यातील काही इंगळ घेतले व तागाची वस्त्रे घातलेल्या पुरुषाच्या हातात ठेवले, त्याने ते घेतले आणि बाहेर गेला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options