निर्गम ३०:३४-३६
३४
मग याहवेह मोशेला म्हणाले, “गंधरस, जटामांसी व गंधाबिरुजा व शुद्ध ऊद हे सुगंधी मसाले घे, हे सर्व समान प्रमाणात असावे,
३५
सुगंधी द्रव्ये तयार करणार्याच्या कुशलतेप्रमाणे सुगंधी धूप बनव. तो मीठ घातलेला, शुद्ध आणि पवित्र असावा.
३६
त्यातील काही कुटून त्याची बारीक भुकटी करावी व ती सभामंडपातील कराराच्या नियमाच्या कोशापुढे ठेवावी, जिथे मी तुला भेटत जाईन. ती तुमच्यासाठी परमपवित्र असावी.
Settings