निर्गम २७:९-१२
९
“निवासमंडपासाठी अंगण बनवावे. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात लांब असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे असावेत,
१०
आणि वीस खांब व वीस कास्याच्या बैठका बनवाव्या, खांबावर चांदीच्या कड्या व पट्ट्या असाव्या.
११
उत्तरेकडील बाजू सुद्धा शंभर हात लांब असून तिलाही पडदे आणि वीस खांब व कास्याच्या वीस बैठका बनवाव्या, खांबाच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या असाव्या.
१२
“अंगणाच्या पश्चिमेकडील बाजू पन्नास हात रुंदीची असावी व त्यासाठी पडदे, व दहा खांब व दहा बैठका असाव्या.
Settings