Skip to content
निर्गम २७:१६-१९

निर्गम २७:१६-१९

१६
“अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी, निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व रेशमी तागाचा, वीस हात लांबीचा पडदा असावा; त्यावर भरतकाम केलेले असावे; त्यात चार खांब व चार बैठका असाव्या.
१७
अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व खांबांना चांदीच्या पट्ट्या, कड्या व कास्याच्या बैठकी असाव्या.
१८
अंगणाची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पाच हात उंचीचे पडदे आणि कास्याच्या बैठकी असाव्या.
१९
निवासमंडपातील सेवेसाठी लागणारी सर्व पात्रे व उपकरणे, त्यांच्या मेखा व अंगणाच्या सर्व मेखा कास्याच्या असाव्यात.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options