एस्तेर २:१७-१८
१७
इतर सर्व स्त्रियांपेक्षा राजाने एस्तेरवर अधिक प्रीती केली, त्याने तिला इतर सर्व कुमारिकांपेक्षा जास्त पसंत केले, तो तिच्यावर इतका प्रसन्न झाला की त्याने तिच्या मस्तकांवर राणीचा राजमुकुट ठेवला आणि वश्तीच्या जागी एस्तेरला राणी केले.
१८
हा प्रसंग साजरा करण्यासाठी, राजाने आपल्या सर्व अधिकार्यांना व सेवकांना एस्तेरसाठी एक भव्य मेजवानी दिली. त्यावेळी त्याने सर्व प्रांतांत रजा जाहीर केली आणि शाही उदारतेने देणग्या दिल्या.
Settings