उपदेशक ८:१-८
१
सुज्ञासारखा कोण आहे? गोष्टींचे स्पष्टीकरण कोणाला माहीत आहे? मनुष्यांचे सुज्ञान त्यांचे मुख उजळून टाकते आणि त्यांचे कठोर स्वरूप बदलते.
२
मी म्हणतो, राजाच्या आज्ञेचे पालन करा, कारण तशी तुम्ही परमेश्वरासमोर शपथ घेतली आहे.
३
राजाची उपस्थिती सोडण्याची घाई करू नका. परंतु एखाद्या वाईट गोष्टींच्या बाजूने उभे राहू नका, कारण राजा त्याला योग्य वाटेल ते करतो.
४
कारण राजाच्या वाणीत अधिकार आहे, “हे तू काय करतो” असे त्याला कोण म्हणणार?
५
त्याच्या आज्ञांचे पालन करणार्यांना इजा होणार नाही, आणि सुज्ञ माणसाच्या अंतःकरणाला योग्य वेळ आणि प्रक्रिया माहीत होईल.
६
जरी त्या व्यक्तीला भारी यातना सोसाव्या लागतात, तरी प्रत्येक गोष्टींसाठी योग्य वेळ आणि प्रक्रिया ठरलेली असते.
७
जर कोणालाही आपले भविष्य माहीत नसते, तर पुढे काय घडणार हे तो इतरांना कसे सांगणार?
८
जसे कोणत्या मनुष्याला वार्यावर नियंत्रण करण्याचे सामर्थ्य नाही, तसेच त्यांच्या मृत्यूच्या वेळेवरही कोणाला अधिकार नाही. जसे कोणालाही युद्धाच्या वेळी सुट्टी नसते, तसेच दुष्टता करणाऱ्यांना ती त्यातून सुटका देत नाही.
Settings