उपदेशक ५:१-३
१
परमेश्वराच्या मंदिरात जाताना तू तुझी पावले सांभाळ. बोध ऐकण्यासाठी परमेश्वराच्या समीप जा, मूर्ख लोकांसारखे यज्ञबली देण्यापेक्षा बरे, कारण आपण चूक करीत आहोत, हे त्यांना कळत नाही.
२
बोलण्यात उतावळा असू नको, परमेश्वरासमोर काहीही उच्चारण्यास आपल्या मनात घाई करू नकोस. कारण परमेश्वर स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे शब्द थोडकेच असू दे.
३
अनेक चिंता असल्यास स्वप्न पडते, आणि जास्त बडबड करण्याने मूर्ख ओळखला जातो.
Settings