Skip to content
उपदेशक २:११

उपदेशक २:११

आजूबाजूच्या संदर्भासह वचन ११ दाखवत आहे.
मी स्वतःसाठी चांदी आणि सोन्याचा व राजांच्या व प्रांताच्या मौल्यवान वस्तूंचा मोठा संग्रह केला. मी गायक आणि गायिका ठेवल्या, तसेच उपपत्न्यांसाठी जनानखानाही तयार केला—जे मनुष्याचे हृदय हर्षित करते.
माझ्यापूर्वी यरुशलेममध्ये असलेल्यांपेक्षा मी फार थोर झालो. या सर्वांमध्ये माझे ज्ञान माझ्यासोबत राहिले.
१०
माझ्या नेत्रांनी जे इच्छिले असे काहीही मी नाकारले नाही; माझ्या हृदयाला कोणत्याही सुखासाठी नकार दिला नाही. माझ्या सर्व कष्टसाध्य कार्याने माझे अंतःकरण हर्षित होत असे, हाच माझ्या सर्व परिश्रमांचा मोबदला होता.
११
तरी जेव्हा माझ्या सर्व हस्तकृतीचे, आणि माझ्या कष्टसाध्य कार्याने मी काय मिळविले याचा मी आढावा घेतला, तर सर्वकाही व्यर्थ, वार्‍याचा पाठलाग करण्यासारखे होते; सूर्याखाली काहीच लाभले नाही.
१२
मग मी सुज्ञान समजून घ्यावे, आणि वेडेपणा व मूर्खता हे सुद्धा कळावे म्हणून मी माझे विचार त्याकडे वळविले. जे गतकाळात केलेले आहे त्यापेक्षा अधिक एखाद्या राजाच्या नंतर येणारा पुरुष काय करू शकतो?
१३
मी पाहिले की सुज्ञान मूर्खतेपेक्षा अधिक चांगले आहे, जसा प्रकाश अंधारापेक्षा चांगला आहे.
१४
सुज्ञ व्यक्तीच्या मस्तकावर नेत्र आहेत, तर मूर्ख अंधारात चालत असतो; परंतु मला समजले की अंतिम परिणाम त्या दोघांवर मात करतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options