२४
तुम्ही तुमच्या शेजार्याच्या द्राक्षमळ्यात गेलात, तर हवी तितकी द्राक्षे तुम्ही खावी, परंतु टोपलीत घालून तुम्ही काहीही नेऊ नये.
२५
आपल्या शेजार्याच्या उभ्या पिकात तुम्ही गेलात, तर हवी तेवढी कणसे तुम्ही हाताने मोडून खावी, पण त्याच्या उभ्या पिकास मात्र विळा लावू नये.