Skip to content
अनुवाद ११:८

अनुवाद ११:८

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
तुम्ही या ठिकाणी येईपर्यंत त्यांनी तुमच्यासाठी रानात काय केले,
रऊबेनाचा वंशज एलियाब, याचे पुत्र दाथान व अबीराम यांचे त्यांनी काय केले, जेव्हा पृथ्वीने सर्व इस्राएली छावणीच्या मध्यभागी आपले तोंड उघडले आणि तिने त्यांना, त्यांच्या घरादारांना, त्यांच्या डेर्‍यांना आणि त्यांच्या सर्व मालकीचे सर्व जिवंत प्राणी कसे गिळून टाकले हे तुमच्या मुलांनी पाहिले नाही.
परंतु याहवेहने केलेले हे सर्व महान कार्य तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे.
म्हणून मी तुम्हाला आज देत असलेल्या सर्व आज्ञा पाळाव्या, म्हणजे यार्देन ओलांडून ज्या देशात तुम्ही प्रवेश करणार आहात, तो हस्तगत करण्यास तुम्हाला सामर्थ्य मिळेल.
म्हणजे जो देश त्यांना व त्यांच्या वंशजांना देण्याविषयी याहवेहने तुमच्या पूर्वजांना वचन दिले होते, त्या दुधामधाच्या सुंदर देशात तुम्ही चिरकाल राहाल.
१०
कारण ज्या देशात तुम्ही प्रवेश करणार आहात व तो ताब्यात घेणार आहात, तो देश तुम्ही सोडून आलेल्या इजिप्त देशातील भूमीसारखा नाही. तिथे तुम्ही पेरणी केली व भाज्यांचे मळे लावण्यासाठी जलसिंचन केले.
११
परंतु यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घेण्यासाठी तुम्ही जात आहात, तो देश डोंगराचा व दर्‍याखोर्‍यांचा आहे, जो आकाशातून पडणारा पाऊस पितो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options