Skip to content
दानीएल ५:१०-१६

दानीएलला बोलावणे

दानीएल ५:१०-१६
१०
राजा आणि अधिकार्‍यांचा आवाज ऐकून राणी मेजवानीच्या दिवाणखान्यात आली. ती म्हणाली, “महाराज, चिरायू असा! घाबरू नका, आपली मुद्रा पालटू देऊ नका.
११
कारण ज्याच्यामध्ये पवित्र देवांचा आत्मा आहे असा एक मनुष्य आपल्या राज्यात आहे. तुमच्या पित्याच्या कारकिर्दीत हा मनुष्य जणू काय देवच आहे अशा ज्ञानाने व शहाणपणाने परिपूर्ण असून असे आढळून आले होते. तुमचा पिता नबुखद्नेस्सर राजाच्या कारकिर्दीत त्याला बाबेलमधील सर्व जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी, दैवप्रश्न सांगणारे या सर्वांवर प्रमुख नेमण्यात आले होते.
१२
त्याने हे केले कारण दानीएल हा ज्याला राजा बेलटशास्सर म्हणत होता, त्याच्याकडे उत्तम मन आणि ज्ञान आणि समज होती आणि त्याच्याकडे स्वप्नांचा अर्थ सांगण्याचे, कोडे सोडविण्याचे आणि कठीण समस्या सोडविण्याची क्षमता होती. म्हणून दानीएलला बोलवा म्हणजे तो तुम्हाला त्या लिखाणाचा अर्थ सांगेल.”
१३
तेव्हा दानीएलला राजासमोर आणण्यात आले आणि राजाने त्याला म्हटले, “दानीएल तो तूच आहेस काय, ज्याला माझे पिता राजा यांनी यहूदीयातून कैदी म्हणून आणला होता?
१४
तुझ्यामध्ये देवांचा आत्मा आहे आणि प्रकाश, बुद्धी आणि उत्कृष्ट शहाणपण यांनी तू परिपूर्ण आहेस असे मी ऐकले आहे.
१५
ज्ञानी लोकांनी आणि ज्योतिषांनी भिंतीवरील हे लिखाण वाचावे आणि त्याचा अर्थ काय आहे हे सांगावे म्हणून त्यांना माझ्यापुढे आणले पण ते अर्थ सांगू शकले नाही.
१६
मी तुझ्याबद्दल ऐकले आहे की तू अर्थ सांगण्यात आणि कोडी सोडविण्यात सक्षम आहेस. जर तू हे लिखाण वाचशील आणि त्याचा अर्थ मला समजावून सांगशील, तर तुला जांभळा पोशाख देण्यात येईल आणि गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात येईल आणि राज्यात तू तिसर्‍या क्रमांकाचा सत्ताधारी होशील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options