Skip to content
दानीएल ३:२८-२९

दानीएल ३:२८-२९

२८
तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, “शद्रख, मेशख व अबेदनगोचे परमेश्वर धन्यवादित असो. ज्यांनी राजाची आज्ञा मोडून आपल्या परमेश्वराशिवाय अन्य दैवतांची सेवा किंवा उपासना करावयाची नाही असे ठरवून मरण पत्करले, तेव्हा त्याने आपला दिव्यदूत पाठवून आपल्या विश्वासू सेवकांची सुटका केली.
२९
म्हणून मी असे फर्मान काढतो की शद्रख, मेशख आणि अबेदनगोच्या परमेश्वराविरुद्ध कोणतेही राष्ट्र किंवा भाषा बोलणारे काहीही बोलतील तर त्यांचे तुकडे तुकडे करावेत आणि त्यांच्या घरादाराचेही उकिरडे करण्यात यावे. कारण परमेश्वर जसे सोडवितात, तसे दुसर्‍या कोणत्याही दैवताला करता येणार नाही.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options