Skip to content
2 तीमथ्य २:१६-२१

2 तीमथ्य २:१६-२१

१६
भक्तिहीन वादविवाद टाळा, कारण जे त्यात गुंततात ते अधिकाधिक भक्तिहीन होतील.
१७
आणि याप्रकारचे शिक्षण कुजलेल्या जखमेसारखे पसरेल. हुमनाय व फिलेत, ती दोघे अशा प्रकारची माणसे आहेत.
१८
त्यांनी सत्याचा मार्ग सोडला आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान आधीच झाले आहे, अशी घोषणा करीत अनेकांचा विश्वास नष्ट केला आहे.
१९
परंतु परमेश्वराने घातलेला पाया स्थिर आहे, त्यास शिक्का हा आहे: “जे प्रभूचे आहेत, त्यांना ते ओळखतात,” आणि “प्रभूचे नाव घेणार्‍यांनी अधर्मापासून दूर राहावे.”
२०
मोठ्या घरात सोन्याचांदीची, तशीच काही लाकडाची व मातीची बनविलेली पात्रे असतात. काही विशेष उद्देशासाठी व काही सामान्य वापरासाठी आहेत.
२१
म्हणूनच, जो स्वतःला त्यापासून दूर राहून शुद्ध करतो, तो सन्मानास नेमलेले, पवित्र, स्वामीसाठी उपयुक्त आणि प्रत्येक चांगल्या कार्यासाठी तयार केलेले पात्र मानला जाईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options