2 शमुवेल २२:४-७
४
“स्तुतीस योग्य याहवेहचा, मी धावा केला, आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली.
५
मृत्यूच्या लाटांनी मला घेरले; नाशाच्या प्रवाहांनी मला बुडवून टाकले.
६
मृतलोकाच्या दोर्यांनी मला सभोवती घेरले; मृत्यूचे भय मला सामोरे आले,
७
“मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला; मी माझ्या परमेश्वराचा धावा केला. आणि त्यांनी आपल्या मंदिरातून माझी आरोळी ऐकली; माझा धावा त्यांच्या कानी पडला.
Settings