2 राजे ४:२२-२४
२२
तिने आपल्या पतीला हाक मारली आणि म्हटले, “एक सेवक व एक गाढव माझ्याकडे पाठवून द्या, कारण मला ताबडतोब परमेश्वराच्या मनुष्याकडे त्याची भेट घेऊन परत येते.”
२३
त्याने विचारले, “आजच त्याच्याकडे का जात आहे? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्बाथ नाही.” ती म्हणाली, “हा ठीक आहे.”
२४
मग तिने गाढवावर खोगीर घातले व तिच्या सेवकास म्हणाली, “चल, गाढव त्वरेने हाकलीत ने, मी सांगितल्याशिवाय वेग कमी करू नको.”
Settings