Skip to content
2 राजे २०:१-७

2 राजे २०:१-७

त्या दिवसांमध्ये हिज्कीयाह राजा आजारी पडला आणि मरणपंथाला लागला. आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्टा त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: तुझ्या घराची आवराआवर कर, कारण तू मरणार आहेस; तू बरा होणार नाहीस.”
हे ऐकताच हिज्कीयाहने आपले तोंड भिंतीकडे वळविले आणि याहवेहकडे प्रार्थना केली,
“हे याहवेह, मी तुमच्यापुढे कसा विश्वासूपणाने आणि पूर्ण मनोभावे समर्पित होऊन चाललो व नेहमी तुमच्या दृष्टीने योग्य तेच केले, याचे स्मरण करा.” आणि हिज्कीयाह अतिदुःखाने रडू लागला.
यशायाह नगरीच्या राजवाड्याच्या आवाराबाहेर जाण्यापूर्वीच याहवेहचे वचन त्याच्याकडे आले:
“परत जा आणि माझ्या लोकांचा अधिपती हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; आजपासून तिसर्‍या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जाशील. मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन.
आणि मी तुला आणि या शहराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवेन. माझ्या नावाच्या गौरवासाठी व माझा सेवक दावीदासाठी मी या शहराचे रक्षण करेन.’ ”
तेव्हा यशायाहने म्हटले, “अंजिराचा लेप तयार करा.” त्यांनी तसे केले आणि त्याच्या गळवावर लावला आणि तो बरा झाला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options