Skip to content
2 राजे १:९-१२

2 राजे १:९-१२

नंतर राजाने आपल्या एका सेनाधिकार्‍याला पन्नास शिपायांसह एलीयाहकडे पाठविले. सेनाधिकारी एलीयाहकडे गेला जो एका डोंगराच्या शिखरांवर बसलेला होता आणि त्याला म्हणाला, “हे परमेश्वराच्या मनुष्या, राजाने आदेश दिला आहे, ‘खाली या!’ ”
१०
एलीयाहने सेनाधिकार्‍याला म्हटले, “जर मी खराच परमेश्वराचा मनुष्य असेन, तर स्वर्गातून अग्नी उतरो आणि तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो!” तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि सेनाधिकार्‍यास व त्याच्या सर्व शिपायांना भस्म केले.
११
तेव्हा राजाने आणखी दुसर्‍या एका सेनाधिकार्‍यास पन्नास शिपायांसह एलीयाहकडे पाठविले. सेनाधिकारी त्याला म्हणाला, “हे परमेश्वराच्या मनुष्या, राजाने आदेश दिला आहे, ‘लवकर खाली उतरून या!’ ”
१२
एलीयाहने उत्तर दिले, “मी परमेश्वराचा मनुष्य असेन, तर स्वर्गातून अग्नी उतरो आणि तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो.” मग परमेश्वराचा अग्नी स्वर्गातून उतरला आणि त्याला व त्याच्या पन्नास माणसांना भस्म केले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options