Skip to content
2 राजे १:९-१०

2 राजे १:९-१०

नंतर राजाने आपल्या एका सेनाधिकार्‍याला पन्नास शिपायांसह एलीयाहकडे पाठविले. सेनाधिकारी एलीयाहकडे गेला जो एका डोंगराच्या शिखरांवर बसलेला होता आणि त्याला म्हणाला, “हे परमेश्वराच्या मनुष्या, राजाने आदेश दिला आहे, ‘खाली या!’ ”
१०
एलीयाहने सेनाधिकार्‍याला म्हटले, “जर मी खराच परमेश्वराचा मनुष्य असेन, तर स्वर्गातून अग्नी उतरो आणि तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो!” तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि सेनाधिकार्‍यास व त्याच्या सर्व शिपायांना भस्म केले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options