Skip to content
2 इतिहास २३:९-१२

2 इतिहास २३:९-१२

यहोयादा याजकाने परमेश्वराच्या मंदिरामधील दावीद राजाचे भाले व मोठ्या आणि लहान ढाली होत्या, त्या शताधिपतींच्या हाती दिल्या.
१०
त्याने सर्व पुरुषांना प्रत्येकाच्या हातात शस्त्र घेऊन राजाभोवती; मंदिराच्या दक्षिणेच्या बाजूकडून उत्तरेच्या बाजूपर्यंत; वेदीजवळ व मंदिराजवळ उभे केले.
११
मग यहोयादाने व त्याच्या पुत्रांनी राजाच्या पुत्राला बाहेर आणले, त्याच्या शिरावर राजमुकुट ठेवला; त्यांनी त्याच्या हातामध्ये कराराची प्रत दिली आणि त्याला राजा म्हणून घोषित केले. मग त्यांनी त्याला अभिषेक केला व मोठ्याने जयघोष करून ते म्हणाले, “राजा चिरायू होवो!”
१२
जेव्हा अथल्याहने लोकांच्या धावपळीचा आणि राजाचा जयघोष करण्याचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options